Wednesday, February 11 2026 11:17 pm

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्व‍िकारला पदभार

 

ठाणे (11)  : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची  निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या  निवडणूकीत शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांची महापौर तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदभार स्व‍िकारला. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

         यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापाैर कृष्णा दादू पाटील, शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांचेही स्वागत करुन त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेविका व नगरसेवक उपस्थ‍ित होते.