मुंबई, 13 : अर्थसंकल्पातील गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय, जलसंपदा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण विभाग या विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होऊन विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, अन्न, नागरी पुरवठा व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तरे दिली.
सदस्यांनी मांडलेल्या सूचना व मागण्यांची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सर्व मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले.
