Saturday, June 27 2026 12:35 pm
latest

कोकण पदवीधर मतदारसंघातील पात्र मतदार कर्मचाऱ्यांसाठी 26 जून 2024 रोजी नैमित्तिक रजा

ठाणे, 20 – विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 26 जून 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मर्यादीत स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. ही नैमित्तिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी या दिवशी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे