Sunday, March 22 2026 12:40 pm

दिलखुलास व्यक्तिमत्व हरपले – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, 29 : दादांचे अपघाती निधन ही अत्यंत वेदना देणारी घटना आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. सदैव वेळ पाळणारे दादा आज वेळेआधीच आपल्यातून निघून गेले, ही घटना मनाला सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, निर्भीड व्यक्तिमत्व, पहाटेपासून जनतेच्या सुखदुःखात स्वतःला वाहून घेणारे, महाराष्ट्राच्या विकासाची दूरदृष्टी ठेवणारे दादा आज आपल्यात नाहीत.

कार्यकर्त्यांची होणारी कामे तातडीने करून देण्याचे कसब दादांचे होते. प्रशासनावर भक्कम पकड होती. काल मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी माझी आणि दादांची एका विषयावर चर्चा होत असतांना अतिशय दिलखुलासपणे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली, तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.

दादांवर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे अतूट प्रेम होते. त्याचबरोबर सर्व पक्षातील नेते व कार्यकर्ते दादांचा आदर करत होते. नाशिक जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने, शिक्षण विभागातील विद्यार्थी, पालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली.