Wednesday, February 4 2026 7:30 am

अजित दादांच्या अकाली मृत्यू ने महाराष्ट्राचे न भरून येणार नुकसान झाले.. एक उमदा, स्पष्ट वक्ता नेता गेला…….आमदार संजय केळकर…

ठाणे, 29 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे असे अपघाती निधन होणे हे धक्कादायक आणि वेदनादायी आहे. महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रातील राजकारणातलं कधीही न भरून येणार नुकसान झालं आहे. प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं याची शैली अजित दादांकडे होती. एक मजबूत पकड, जरब असा दरारा दादांचा प्रशासनावर होता. काम होणार असेल तर हो म्हणायचे नसवलं तर नाही असे स्पष्ट होते. कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय होते. कार्यकर्त्याच्या पाठीशी कसे उभे रहायचं याचं उत्तम उदाहरणं म्हणजे अजित दादा. राजकारणातलं उमदं असं नेतृत्व आज आपल्यातून गेलं आहे. अत्यंत दुःखद अशी घटना घडली आहे. अजित दादांच्या कामाची पद्धत वेगळी होती. मला आठवतंय जेव्हा मी दादांना सांगितलं की गृहनिर्माण संस्थामध्ये आमदार निधी वापरता यावा आणि या करिता मी पाठपुरावा करत होतो. तेव्हा अजित दादा म्हणाले, संजयजी खूप चांगला प्रस्ताव आहे मी सहामहिन्यात संपूर्ण माहिती घेतो, आपण नक्की पॉसिटीव्ह करू. आणि या विषय बाबत जि आर देखील त्यांनी काढला. महाराष्ट्राच्या हिताकरिता त्यांनी अनेक कामे केली. स्वभावात जरी ते रोख ठोक होते तरी सर्वपक्षातील कार्यकर्त्यांचे ते आवडते नेते होते.

अजित दादांचा असा अकाली मृत्यू महाराष्ट्राला चटका लावणारा आहे. मी माझ्या परिवारातर्फे, भारतीय जनता पार्टी तर्फे अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.