ठाणे, 30 – – महाराष्ट्राच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्वप्रथम पालखी सोहळ्याचा मान मिळवणारा ठाणे पूर्वेकडी आई चिखलादेवी (गांवदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२५ संपन्न होणार आहे.
पूर्व भागातील आगरी कोळी बांधवांची कुलदैवत कोपरीची ग्रामदैवत म्हणून आई चिखलादेवीची ओळख आहे या कोपरी परिसराची ग्रामदैवत असलेल्या चिखला देवीची पालखी सोहळा आगरी कोळी व कोपरी परिसरातील रहिवाशांच्या वतीने वतीने हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला जातो या पालखी सोहळ्यामध्ये या पूर्वभागातील सर्व नागरिक हिरहिरीने भाग घेतात तसेच ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी बांधव एकत्र येऊन हा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करतात.
इतिहास कालीन असलेल्या या मंदिराला या आगरी कोळ्यांचा मोठा इतिहास आहे हे मंदिर शंभर वर्षाहून अधिक काळ जुने आहे तर या मंदिराची जत्रा शतकोस्तव पार केली आहे तर पालखी सोहळा यंदाचे हे २० वे वर्षे आहे.
या पालखी सोहळ्यामध्ये भजन, कीर्तन, वेगवेगळ्या वेशभूषा करून लहान मुले तसेच महिलावर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये येथील नागरिक एकच रंगाचे कपडे परिधान करून या सोहळ्यात सामील होतात यंदाचा पालखी सोहळ्याचा रंग आहे लाल.
साधेपणाने व पूर्व पारंपारिक पद्धतीने हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो.
” हा पालखी सोहळा व हा जत्रोत्सव शंभर वर्षाची परंपरा आहे आम्ही हा सोहळा साधेपणाने तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा करत असतो या सोहळ्याला अजून पर्यंत एकही गालबोट लागले नसल्याने आम्ही हा सोहळा एकत्रितपणे व एकजुटीने करत असतो”-श्री दिलीप (दादा) पाटील गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष यांनी सदर प्रसंगी प्रतिक्रिया दिली.
ठाणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व भाविकांनी या सोहळ्यास आवर्जून भेट द्यावी असे आव्हान पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.
