Monday, December 22 2025 8:53 am
latest

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने 15 ठिकाणी मोफत वह्या वाटप

ठाणे, 30 ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरीब गरजू विद्यार्थी – विध्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येत आहे. गेली 20 वर्ष हा स्तुत्य उपक्रम आ. केळकर करत आहेत. शिवाय ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्फत मोफत वह्या वाटप करण्यात येतात. ठाण्याच्या नौपाडा, चंदनवादी, मानोरमा नगर, ढोकाळी, राबोडी, धर्मवीरनगर, महागिरी अशा विविध 15 ठिकाणी मोफत वह्या वाटपाचा महाकार्यक्रम सलग तीन दिवस होणार आहे. जवळ जवळ चौदा हजार वह्या वाटप होणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये या भावनेने आम्ही मोफत वह्या वाटप करत असतो, त्यामुळे त्यांना जेव्हढी ताकत देता येईल तेव्हढी देण्याचा आमचा प्रयत्न असतो अशी माहिती आ. केळकर यांनी बोलताना दिली.

नौपाडा भागात पंढरीनाथ पवार तर चंदनवाडी येथे संतोष साळुंखे यांनी आ. केळकर यांच्या हस्ते व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

चंदनवाडी येथील वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी जेष्ठ नगरसेवक नारायण पवार उपस्थित होते.