Monday, December 22 2025 12:45 pm
latest

प्रत्येकाच्या कामासाठी आपण प्रयत्न करणे हे महत्वाचे आहे.. आ. केळकर…

ठाणे, 09 – ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपाच्या खोपट कार्यालयात साकाळी 10.30 ते 1 पर्यंत उपस्थित असतात. या उपक्रमाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आ. केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात.

यावेळी विविध तक्रारीची 48 निवेदने आ. केळकर यांच्याकडे प्राप्त झाली. विकासकाने घरांबाबत केलेली फसवणूक, कंत्राटी कामगार, सी सी टी व्ही विषय, बाधित होणारी दुकाने पुनर्वसन, पाणी विषय, विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विषय, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, बदली विषय, ठा म पा कर्मचारी विषय, शालेय ऍडमिशन विषय, सफाई कामगार विषय अशा विविध विषयांतील निवेदने आ. केळकर यांना देण्यात आली.

यावेळी खोपट कार्यालयात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगसेवक भरत चव्हाण, दीपक जाधव, ओमकार चव्हाण, उपस्थित होते.

आजच्या जनसंवाद उपक्रमात फसवणूकी पासून सामूहिक विविध विषयांच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या. त्या तक्रारीचे निरसन करणे, त्या पाठपुरावा करण्याकरिता यंत्रणा आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे काम होतंच असे नाही, पण आपण प्रयत्न केले पाहीजे, त्यांचे समाधान झाले पाहीजे असे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.