Monday, December 22 2025 11:22 am
latest

नरेश बिरवाडकर यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा कामगार रत्न पुरस्कार प्रदान

ठाणे, ता. 16 : शिपिंग क्षेत्रातील कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत, यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या व कामगारांचे प्रश्न समजावून घेवून ते तडीस नेण्यासाठी सतत कार्यशील असलेले कामगार नेते नरेश बिरवाडकर यांना नुकतेच कोकण मराठी पत्रकार संस्थेच्यावतीने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कामगार रत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी पत्रकार अनिलराज रोकडे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, कोकण मराठी पत्रकार संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर , पत्रकार दिलीप देवळेकर उपस्थित होते.
शिपिंग क्षेत्रातील कामगार हे अत्यंत कमी पगारावर नोकरी करत, या कामगारांना न्याय मिळावा यासाठी नरेश बिरवाडकर हे सातत्याने पाठपुरावा करत होते, कामगारांचे म्हणणे ऐकून घेवून त्या माध्यमातून त्यांना असलेल्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते, त्यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे शिपिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न सुटू लागले व त्यांच्या समस्यांवरही तातडीने तोडगा निघत असे. कामगारांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले नरेश बिरवाडकर हे सामाजिक कार्यातही पुढाकार घेवून आपल्या गावातील रहिवाशांसाठी समाजोपयोगी कार्य करत आहे. अत्यंत प्रामाणिक व मेहनती असलेल्या नरेश बिरवाडकर यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना या कामगार रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.