Tuesday, December 23 2025 12:25 am
latest

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

मुंबई, 09: ठाणे पोलीस दलाकडून हुक्का पार्लरच्या आड चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येत आहे. ठाणे पोलीस दल गोपनीय छापे, गुन्हे दाखल करणे, परवाने तपासणे अशा अनेक स्तरांवर कारवाई करीत आहे. ठाणे शहरामध्ये जाने २०२५ ते अद्यापपर्यंत एकूण ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापे टाकून संबधितांवर कोटपा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठाणे शहरामध्ये तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मॉल्स, कॅफे आणि हँग आऊट्स येथे विशेष गस्त व गुप्त तपासणी सुरू आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस दलाने अशा बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘ झिरो टोलरन्स’ धोरण अवलंबिले आहे. पुढील काळातही अशा हुक्का पार्लरच्या आड सुरू असणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याची मोहिम अधिक गतीने राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी दिली आहे.