Monday, December 22 2025 8:33 am
latest

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आनंदवन परिवारातर्फे आभार

मुंबई, 11: आनंदवनच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुष्ठरुग्णांच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली होती. आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या अनुदानात वाढ करण्यात आल्याने महारोगी सेवा समिती, वरोरा आणि आनंदवन परिवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

स्वर्गीय बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त, आनंदवनला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.