केळकरांनी ठाण्याची घुसमट सोडवली नाही
ठाणे,18 – कचऱ्याच्या ढिगात ठाणे हरवलंय, ट्राफिक जाम मध्ये ठाणे अडकतय,पाण्यावाचून ठाणे तडफडतय अन रोजच्या गर्दीत ठाणेकरांचा जीव घुसमटतो आहे. गेल्या १० वर्षात भाजपच्या संजय केळकर यांनी ठाण्याचा घुसमट सोडवली नाही असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार राजन यांनी आज केला.
स्वच्छ प्रतिमेचा टेंबा मिळवणाऱ्यांनी ठाणे अस्वच्छ ठेवले असून गेल्या काही दिवसात ठाणे बदललय,ठाणे स्वच्छ आणि सुंदर होतंय अशा घोषणा दिल्या गेल्या. मात्र ठाणे शहरात कचरयांच्या ढिगाचे अस्वच्छ ठाणे म्हणून ओळखू लागले आहे. डंपिंग ग्राउंड,वाहतूक कोंडी, कोस्टल रोड या महत्वाचे प्रकल्प सोडविण्यात विद्यमान आमदार सफसेल फेल ठरले असल्याची टीका राजन विचारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई,धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे आदी जण उपस्थित होते.
आमचे पहिले लक्ष
ठाण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहिले प्राधान्य
शहराची कचरा कोंडीतून मुक्तता करण्यासाठी
बिल्डर लॉबीला आळा घालून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावून हक्काची घरे मिळवून देणार
मासुंदा तलावाच्या काठावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेचे स्मारक उभारणार
सिंगापूरच्या धरतीवर मासुंदा तलावाचा विकास करणार
शहरात घराघरात महिलानांसाठी महानगर गॅसचे जाळे मजबूत करणार
ट्रान्सफॉर्मर नसल्याने विद्युत पुरवठा खंडित केला जातो त्यामुळे ट्रान्सफॉर्मर साठी जागा रिझर्व करून घेणार
सर्व जाती धर्मियांसाठी लग्नकार्य व धार्मिक कार्यासाठी माफक दराने जागा उपलब्ध करून देणार
