ठाणे, 18 – मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांची महाविजयी भव्य बाईक रॅली सोमवारी, प्रियांका हॉटेल- विटावा येथून चावंडाई मंदिरापर्यंत काढण्यात आली. या महाविजयी बाईक रॅलीचे मतदारांनी जोशपूर्ण वातावरणात स्वागत केले.
१४९- मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत (शिवसेना, भाजपा, आरपीआय-आठवले गट, आरपीआय-कवाडे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांची महाविजयी बाईक रॅली, सोमवारी, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत, प्रियांका हाॅटेल-विटावा या मार्गाने.कळवा आगार बसडेपो- घड्याळ चौक, कळवा नाका -शिवसेना मध्यवर्ती शाखा, मनिषानगर गेट नंबर ३ मधून -तरण तलाव मार्गै, गणेश साळवी यांचे निवासस्थान -सायबा नगर, महात्मा फुले नगर मधून बाहेर मुंबई पुणे रोड, खारीगाव नाका -हिरादेवी मंदिर, आझाद चौक -विठ्ठल मंदिर (डावीकडून), ९० फूट मार्गे रघुकूल सोसायटी- पारसिक कॅफे, नेचर ग्लोरी (उजवीकडे),ओझोन व्हॅली- मैत्री वाटिका -वास्तुआनंद, चावंडाई मंदिर येथे समाप्ती झाली. या महाविजयी बाईक रॅलीत महायुतीतील कार्यकर्त्यांनी झेडे घेऊन, नजीब मुल्ला यांच्या विजयाच्या घोषणा देत, ठिकठिकाणी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत, वातावरण निर्मिती करण्यात आली होती.या महाविजयी बाईक रॅलीचे मतदारांनी जोशपूर्ण वातावरणात स्वागत केले. याप्रसंगी मोठ्यासंख्येने महायुतीचे सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
