Monday, December 22 2025 2:04 pm
latest

संजय केळकर यांचा आंबेघोसाळे तलाव परिसरात मॉर्निग वॉक..

नागरिकांशी साधला सवांद..

ठाणे, 15 – मागील काही दिवसा पासून ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संजय केळकर यांनी मॉर्निग वॉक प्रचारावर भर दिला आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी आंबेघोसाळे तलाव परीसरातील मॉर्निग करण्यासाठी आलेल्या लोकांशी चर्चा केली.

ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मॉर्निंग वॉकच्या प्रचारावर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. हिरानंदानी इसेट, ब्रह्माळा तलाव, लोढा अमारा आदी सह इतर भागातील मॉर्निग वॉक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी देखील त्यांनी आंबेघोसाळे तलाव परिसरात येणाऱ्या लोकांशी चालता चालता चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेनेचे चे हेमंत पवार, सुभाष काळे, प्रशांत गावंड, संतोष साळुंखे, अमित जयसवाल, महेश कदम, दिलीप कंकाळे, सुमित सुर्वे आदी सह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मॉर्निग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी केळकर यांना पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या.