Monday, December 22 2025 5:50 pm
latest

वृत्तपत्र जिल्हा विक्रेता सेनेचा महायुतीचे उमेदवार संजय केळकरांचा पाठींबा

ठाणे, 15 – ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून युतीचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेने संजय केळकर यांना जाहीर पाठींबा दिला आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत केळकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार करुन भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मदत करणार आहोत. असेही वृत्तपत्र विक्रेता सेनेने पत्रकाद्वारे जाहीर केले गेले.
केळकरांचा प्रत्येक ठाणेकराला अभिमान आणि आत्मीयता आहे, ते आमदार असुन सुद्धा सर्वसामान्य माणसाला वेळ देणारे कुठलीही अडवणुक न करता त्याची समस्या मार्गी लावणारे आणि कुठलाही बडेजाव नसणारे असे आपले व्यक्तिमत्व आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही केळकरांनी अनेक वेळा सहकार्य केले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ व्हावे, याबबत केळकरांनी अनेकवेळा विधानसभेत आवाज उठवत ती मागणी महायुती सरकारने मान्य करुन घेतली. तसेच विविध क्षेत्रातील लोकांना त्यांनी नेहमीच सहकार्य केलेले आहे. अशा व्यक्तीमत्वाला ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना संपुर्णपणे पाठिंबा जाहिर केला आहे.
ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना अध्यक्ष विष्णू सावंत, सरचिटणीस संतोष विचारे, दीपक सोंडकर, चेतन चाळके, सचिन सावंत, दिनेश रौनक यांच्यसोबत ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे आदी उपस्थित होते.