लोढा अमारा येथील नागरिकांशी साधला सवांद…
ठाणे, 12 – जय श्री राम… संजय केळकर आगे बढो आशा घोषणा देत सकाळी मॉर्निग वॉकसाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांसह बाल तरुणांनी ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांना पाठिंबा दिला.
ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मॉर्निंग वॉकच्या प्रचारावर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यापासून त्यांनी शहरातील विविध भागात मॉर्निग वॉक करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याला ठाणेकर नागरिकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या सह लोढा आमरा येथील मॉर्निग वॉक करण्याऱ्या नागरिकांची भेट घेतली. त्यांच्या बरोबर चालता चालता त्यांनी चर्चा देखील केली. यावेळी नागरिकांनी देखील त्यांना आपला पाठिंबा तुम्हालाच असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच यावेळी जय श्री राम चा गजर सर्वदूर पसरला होता. संजय केळकर आगे बढो हम तुम्हारे साथचा गजर दिला गेला.
