ठाणे, 16- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ठाणे शहरात तसेच राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करुन १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ४८ लाख लाडक्या बहीणींना दोन महिन्याचे तीन हजार रुपयांचे दोन हप्ते त्यांच्या बॅंक खात्यात डायरेक्ट ट्रान्स्फर केले गेले असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील ४८ लाख लाडक्या बहिणींना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळाला असून त्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपयांची रक्कम डायरेक्ट ट्रान्स्फर झाली असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम महिला भगिनींना प्राप्त झाल्याबद्दल राष्ट्रवादी ठाणे मध्यवर्ती कार्यालयात ढोल ताशाच्या गजरात, पेढे भरवून, फटाके वाजवून व महायुती सरकार आणि अजितदादांचा समर्थनार्थ महिलांनी जोरदार घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला.
याप्रसंगी माजी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे, महिला अध्यक्षा वनिता गोतपागर, महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत, विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंढारे, विधानसभा कार्याध्यक्षा लक्ष्मी वैती, सरचिटणीस उज्वला येडे, ब्लॉक अध्यक्षा शामा भालेराव, मनिषा कांबळे, वॉर्ड अध्यक्षा शामल दाभाडे, लता चव्हाण, मानसी चव्हाण, स्वाती जाधव, प्रभावती कुंदे, माया केसरकर, अर्चना कदम, जया कडू, शशिकला पवार, युवती विधानसभा अध्यक्षा सोनिया माने, वॉर्ड अध्यक्षा सरिता जाधव, दिपाली विचारे, निलोफर बांगी, रजिया शेख, वंदना नाईकनवरे, यासमीन शेख, जयबुनिसा शेख, रुकसाना नाईक, गुलनार इद्रिसी, साहिका खान आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
