Monday, December 22 2025 4:44 pm
latest

नवउद्योजकांच्या स्वप्नांना अमृत देणार भरारी. “अमृत” च्या लक्षित गटासाठी, आत्मनिर्भर ही नवसंकल्पना!!!

ठाणे,13 :- दि.01 ऑगस्ट 2024 रोजी “अमृत” आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
या करारांतर्गत नव उद्योजकांना प्रशिक्षण देणे हा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग / संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही, अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणे आणि स्वावलंबनाला चालना देणे, हे या प्रकल्पाचा उद्दिष्ट आहे.
व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी सर्वसमावेशक ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील. यामध्ये प्रशिक्षणार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात येऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन केले जाईल. नियमित ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण दिले जाईल. तसेच डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून त्यांना विपणन सहाय्य देखील देण्यात येईल. आवश्यकता असल्यास, इतर शासकीय योजना आणि कर्ज मिळवून देण्यासाठी बँका आणि इतर संस्थांशी समन्वय साधण्याचे काम करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी अमृतच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
या योजनेद्वारे अमृतच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होतील तसेच महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राचे बळकटीकरण होणार यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.