Monday, December 22 2025 8:51 am
latest

मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा प्रारंभ पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार उदघाटन…

डॉ.गोऱ्हे आषाढी वारीच्या कामांची व दर्शन व्यवस्थेची करणार पाहणी…

मुंबई, 15 : पंढरपूर आषाढी वारी अंतिम टप्यात आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सातत्याने लक्ष ठेवून आहेतच आज त्यांनी पाहणी देखील केली आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे देखील दि.१५ व १६ जुलै रोजी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. यात डॉ.गोऱ्हे दिनांक : १५ जुलै रोजी

सायं ०५:०० श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे यात्रा व्यवस्था पाहणी घेणार आहेत.

सायं ६ वा पत्रकाराशी संवाद साधतील.

संध्याकाळी ६.३० संत मुक्ताई पालखी सोहळा, मुक्ताई मठ – पंढरपूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आभार यात्रा प्रारंभ व संवाद, गोंदवलेकर महाराज मठ – संत ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर पालखी सोहळा दर्शन व संवाद संपवून पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी असणार आहेत.

दि.१६ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत आयोजित आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या समवेत उपस्थित राहतील. त्यानंतर डॉ.गोऱ्हे यांच्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमातून शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुनीता मोरे यांना सांगली जिल्ह्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात आली आहे त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुपारी २.३० ते ४.३० दरम्यान विसावा मंदिर येथे पालख्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहून सर्व पालख्यांचे स्वागत डॉ.गोऱ्हे करणार आहेत.