Monday, December 22 2025 8:28 pm
latest

4 वर्षात 1 लाखाचे 96 लाख, शेअर मार्केटचा बंपर परतावा

मुंबई, 30 : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी अतिशय कमी कालावधीत गुंतवणूकदारांना दमादार परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज (Piccadily Agro Industries), ज्याने अवघ्या 6 महिन्यांत त्यांच्या शेअरहोल्डर्सचे पैसे दुप्पट केले. या कंपनीने 5 वर्षात 9500 टक्के परतावा दिला आहे.
पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज 1994 मध्ये नावारुपाला आली, पण त्याची स्थापना 1953 मध्ये दारू डिस्ट्रीब्यूशन व्यवसायातून झाली. पिकाडिली ब्रँड नाव 1967 मध्ये अस्तित्वात आले. ही कंपनी सध्या भारतातील माल्ट स्पिरीटची सर्वात मोठी स्वतंत्र उत्पादक आणि विक्रेती आहे. ती इथेनॉल, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA), CO2 आणि व्हाईट क्रिस्टल शुगरचे उत्पादन करते. त्याच्या उत्पादनांमध्ये इंद्री ब्रँड नावाखाली सिंगल मॉल्ट व्हिस्की, कॅमिकारा ब्रँड नावाखाली केन जूस रम, तसेच व्हिस्लर आणि रॉयल हायलँड ब्रँड नावाखाली ब्लेंडेड मॉल्ट व्हिस्की यांचा समावेश आहे.
बीएसई डेटानुसार, 5 वर्षांपूर्वी 20 सप्टेंबर 2019 रोजी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 8.05 रुपये होती. सध्या बीएसईवर हा शेअर 772.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. अशाप्रकारे गेल्या 5 वर्षात शेअरची किंमत 9500 टक्क्यांनी वाढली आहे. जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर 9 लाख 60 हजार झाली असती. त्याचप्रमाणे, 50 हजारांची गुंतवणूक 48 लाख आणि 1 लाखाची गुंतवणूक 96 लाख झाली असती.
कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 7300 कोटी आहे. शेअरचे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. जून 2024 अखेरपर्यंत प्रमोटर्सकडे कंपनीत 70.97 टक्के हिस्सा होता. गेल्या 6 महिन्यांत शेअरची किंमत 156 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
वर्षभरात किंमत 650 टक्क्यांनी वाढली आहे. 2 वर्षात 1918 टक्के परतावा मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये, कंपनीचा कंसोलिडेटेड रेवेन्यू 828.12 कोटी आणि निव्वळ नफा 110.37 कोटी नोंदवला गेला आहे.