Saturday, March 7 2026 8:02 am

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वसाधारण, खर्च व पोलीस निरीक्षक दाखल

ठाणे, 4 – भारत निवडणूक आयोगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे चारही निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून कामकाज सुरू केले आहे.
25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून श्री. चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) व श्री. राहिल गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर सर्वसाधारण निरीक्षक म्हणून जे.श्यामला राव हे तर पोलीस निरीक्षक म्हणून कु. इलाक्किया करुणागरन या दाखल झाल्या आहेत.
श्री. मीना हे २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४८ – ठाणे, १५० – ऐरोली, १५१ बेलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील. तर श्री. गुप्ता हे २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४५ मिरा-भाईंदर, १४६ ओवळा-माजिवडा, १४७ कोपरी-माजिवडा या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील.
सर्वसाधारण निरीक्षक श्री. राव आणि पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात कार्यरत झाले आहेत.
नागरिकांनी संपर्क करावा….
२५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांना शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. चंद्र प्रकाश मीना यांचा संपर्क क्रमांक ८३६९०४५८२४ असा असून ई-मेल Expobserver२५pc@gmail.com हा आहे. तर श्री. गुप्ता यांचा संपर्क क्रमांक ८७७९०२६९१४ असा असून Exp.observer.pc२५@gmail.com हा त्यांचा ई-मेल आहे. सर्वसाधारण निरीक्षक श्री. श्यामला राव यांचा संपर्क क्रमांक 8356072099 व 022-20810983 असा असून त्यांचा ई-मेल 25observer@gmail.com असा आहे. श्री.राव यांना रेमंड गेस्ट हाऊस, जे.के.ग्राम, पाचपाखाडी, ठाणे (प), येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.
तर पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) यांचा संपर्क क्रमांक 8591173368 हा असून ilakkiyaips12@gmail.com हा त्यांचा ई-मेल आहे. कु.करुणागरन यांना रेमंड गेस्ट हाऊस, जे.के.ग्राम, पाचपाखाडी, ठाणे (प), येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.