Monday, December 22 2025 4:06 pm
latest

१५ जुलै पासून एसटीच्या प्रत्येक आगारात ” प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” साजरा होणार..!

मुंबई, १२ – प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सुचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा होण्यासाठी येत्या सोमवार पासून आगारनिहाय “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत संबधित विभागाचे विभाग नियंत्रक वेळापत्रकानुसार एका आगारात जाऊन सकाळी १० ते ०२ या सत्रामध्ये प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्विकारतील त्यावर काय उपाय योजना केली पाहिजे याचे संबंधितांना आदेश देतील. त्याच प्रमाणे दुपारच्या सत्रातील त्याच आगारात ३ ते ५ या वेळेमध्ये त्या आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकूण घेतील व त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करतील.
सोबत जोडलेल्या वेळापत्राकानुसार राज्यभरातील सर्व आगारात दर सोमवारी व शुक्रवारी या दोन्ही उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून प्रवाशी व कर्मचारी बंधू-भगिनींना आवाहन करण्यात येते की, आपल्या तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरूपामध्ये ज्या दिवशी आपल्या संबंधित आगारात उपरोक्त उपक्रमाचे आयोजन केले असेल तेव्हा उपस्थित राहून विभाग ‍नियंत्रक यांच्या कडे द्याव्यात.