Monday, December 22 2025 2:09 pm
latest

`स्वर प्रभात’मध्ये पंडीत सुरेश बापट यांचे गायन

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची विशेष उपस्थिती

ठाणे, 23 – ठाण्यातली ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ ही अभिजात संगीतात विविध उपक्रम राबविणारी एक अग्रगणी संस्था आहे. एक दशकाहून अधिक काळ ह्या संस्थेतर्फे बासरी वादन करणारे अनेक विद्यार्थी तयार होऊन आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत. सुविख्यात बासरीवादक पंडित विवेक सोनार यांच्या प्रयत्नांतून संस्थेतर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम होत असतात.
गुरुकुल प्रतिष्ठान तर्फे ‘स्वरप्रभात’ या कार्यक्रमाचे दुसरे पुष्प रविवारी २७ एप्रिल २०२५ रोजी, आम्फिथिएटर, टाऊन हॉल, ठाणे येथे सादर होणार आहे. या कार्यक्रमाला युनियन बँक आणि लाईट बुक रिटेल प्रायव्हेट लिमिटेड चे विशेष सहकार्य लाभले आहे.
सदर कार्यक्रमात ठाण्यातील ज्येष्ठ गायक पंडित सुरेश बापट यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना आत जोशी हार्मोनियम आणि सुहास चितळे तबल्यार साथ करणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं. विवेक सोनार यांचे गुणवंत शिष्य समूह बासरी वादन करतील.
स्वर प्रभात या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जगविख्यात बासरी पंडित हरिप्रसाद चौरसिया उपस्थित राहणार असून ते रसिकां सोबत संवाद देखील साधणार आहेत. त्यांच्या हस्ते पंडित हरिप्रसाद चौरसिया संगीत शिष्यवृत्ती भारतातील निवडक गुणी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे व या कार्यक्रमाचा रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन विवेक सोनार यांनी केले आहे.