Monday, March 23 2026 2:53 am

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींचे जलदगतीने निराकरण

1 हजार 508 तक्रारींपैकी 1 हजार 399 तक्रारींचे शंभर मिनिटांच्या आत निराकरण

ठाणे,18:- निवडणुकीच्या दरम्यान अनियमितता किंवा आचारसंहिता भंगाविषयी काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल”या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संदेश, फोटो, व्हिडिओद्वारे ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत तक्रारीचे निवारण केले जाते.
या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात दि.17 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत 1 हजार 627 तक्रारी प्राप्त झाल्या. या 1 हजार 627 तक्रारींमध्ये एकूण 1 हजार 508 तक्रारी दखलपात्र असून उर्वरित 109 तक्रारी अदखलपात्र आहेत. या 1 हजार 508 दखलपात्र तक्रारींमधून 1 हजार 399 तक्रारींचे 100 मिनिटांच्या आत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचेही निराकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सी-व्हिजिल कक्षाचे जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी श्री.विजयसिंह देशमुख व सहाय्यक समन्वय अधिकारी श्रीमती सुकेशिनी पगारे यांनी दिली आहे.