Monday, December 22 2025 9:25 pm
latest

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई 16 : पनवेल (जि. रायगड) येथील सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्याच्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे गृह राज्यमंत्री (शहरे) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासावेळी सांगितले.

विधानसभा सदस्य संतोष बांगर यांनी यासंदर्भात आज विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले, सारा नर्सिंग कॉलेज येते विद्यार्थी आत्महत्या ही घटना दुर्दैवी आहे. याचा तपास सुरू आहे. यातील आरोपी फरार असून या घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने काही फोन रेकॉर्ड्स पोलिसांच्या हाती लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या महाविद्यालयास देण्यात आलेल्या परवानगी संदर्भात संबंधित विभागाकडून माहिती घेतली जाईल, असेही राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.