Monday, December 22 2025 9:26 pm
latest

शुक्रवार आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन

ठाणे,20 : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवार, २१ जून रोजी स.११.०० वाजल्यापासून शनिवार, २२ जून रोजी स. ११.०० वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्यावेळी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात स्टेम प्राधिकरणाकडून येणारा पाणीपुरवठा झोनिंग करून सुरू ठेवला जाईल.

शुक्रवार, २१ जून रोजी स.११.०० ते रा. ११.०० या १२ तासांच्या अवधीत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईपलाईन येथील पाणी पुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार, २१ जून रोजी रा. ११ ते शनिवार, २२ जून रोजी स. ११ या काळात ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंबा व कळव्याचा काही भाग येथे १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात, पिसे उदंचन केंद्र, टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब सब स्टेशनमधील कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, फिल्टर बेड वॉल्व्ह दुरुस्ती आदी तातडीची कामे करण्यात येणार आहेत.

या शट डाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.