Wednesday, March 4 2026 5:51 am

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे (14) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभागसमिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बारवी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवार दिनांक 15/12/2023 दुपारी 12.00 वा. ते रात्री 12.00 पर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपरुवठा 12 तासासाठी पूर्णपणे बंद राहिल. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.