Saturday, March 7 2026 5:59 pm

शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी नाही

ठाणे २३ : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २६ एप्रिल रोजी स. ९ ते शनिवार, २७ एप्रिल रोजी स. ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.

या शट डाऊनच्या काळात, शुक्रवार, २६ एप्रिल रोजी स. ९ ते शुक्रवार रा. ९ या वेळेत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईप लाईन या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार रा. ९ ते शनिवार, २७ एप्रिल रोजी स. ९ या वेळेत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहील.

या शट डाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.