Monday, December 22 2025 3:59 pm
latest

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

ठाणे, 08:- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेल्या सर्व नोडल अधिकारी, समन्वय अधिकाऱ्यांची निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली.
या बैठकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, शरद पवार, हरिश्चंद्र पाटील, विकास पाटील, इब्राहिम चौधरी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, विठ्ठल डाके, उपायुक्त उमेश बिरारी, संजय जाधव, कार्यकारी अभियंता सुनिल पाटील, सुनिल महाले, समाजकल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी संजय बागूल, निवडणूक खर्च नियंत्रण समितीचे श्री.उबाळे, श्री.सूर्यवंशी, श्री.बुरुडकर आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे नोडल अधिकारी तसेच निवडणूक शाखा तहसिलदार श्रीमती भगत, प्रदीप कुडाळ, नायब तहसिलदार स्मितल यादव उपस्थित होते.
या बैठकीत नामांकन, छाननी, निवडणूक चिन्ह वाटप, अपात्रता, कायदा आणि सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, पोस्टल मतपत्रिका, खर्चाचे निरीक्षण, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, पेड न्यूज, मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे इत्यादी बाबींशी संबंधित विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरण करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, समन्वयक अधिकारी उपस्थित होते.