Thursday, February 5 2026 4:57 pm

वाशी, बेलापूर येथे नरेश म्हस्के यांचा प्रचाराचा धडाका  

प्रचार फेरीत उद्योग मंत्री उदय सामंत, नाईक कुटुंबिय, आमदार मंदा म्हात्रे सहभागी
नवी मुंबई, 16 – वाशी येथे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून तब्बल ६ ठिकाणी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रभात फेरी काढून नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर सीबीडी, बेलापूर विभागात प्रचार फेरी काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
वाशी सेक्टर १० येथील स्व. राजीव गांधी जॉगर्स पार्क, सानपाडा उद्यान, ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेक्टर ८ उद्यान, सी शोर या उद्यानांना नरेश म्हस्के यांनी सकाळी भेट देत ज्येष्ठ नागरिकांचे अशार्वाद घेत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी  शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.  
सकाळी १० वाजता सी.बी.डी. बेलापूर येथून प्रचार फेरीस प्रारंभ झाला. या प्रचार फेरीत उद्योग मंत्री उदय सामंत, लोकनेते गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार डॉ. संजिव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते.
दुपारी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.