Sunday, March 22 2026 12:06 pm

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनाच्या विधानपरिषदेच्या कामकाजास सुरूवात

नागपूर 09 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानपरिषदेत सुरुवात झाली. त्यानंतर वंदे मातरम् गीतास ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वंदे मातरम्‌चे संपूर्ण गायन करण्यात आले.

यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रिमंडळ सदस्य व विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.