Monday, December 22 2025 10:35 am
latest

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन

मुंबई, 23 : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एअर इंडियाच्या विमानाने रात्री ११ वाजता आगमन झाले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी श्री. बिर्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानभवन येथे २३ व २४ जून, २०२५ रोजी या दोन दिवसीय परिषदेस लोकसभा अध्यक्ष श्री.बिर्ला उपस्थित राहणार आहेत.