Monday, December 22 2025 10:33 am
latest

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

मुंबई, 23 : राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील किल्ले सज्जनगड मार्गावर दरड कोसळली असून दरड हटविण्याचे काम सुरु असल्याचे, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२२ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात १९.८ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात १६.३ मिमी, चंद्रपूर १२.३ मिमी, ठाणे जिल्ह्यात ११.१ मिमी आणि रायगड जिल्ह्यात ९.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २२ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ११.१, रायगड ९.४, रत्नागिरी १६.३, सिंधुदुर्ग ८.५, पालघर १९.८, नाशिक ५.४, धुळे ०.२, नंदुरबार ४.८, जळगाव २.६, अहिल्यानगर ०.३, पुणे ३.४, सोलापूर ०.४, सातारा ५.२, सांगली २.७, कोल्हापूर ५.१, छत्रपती संभाजीनगर ०.७, जालना ०.६, लातूर ०.८, धाराशिव १.५, नांदेड २.४, परभणी ०.३, हिंगोली ३.८, बुलढाणा ३, अकोला १.४, वाशिम १.४ अमरावती १.१, यवतमाळ ९.३, वर्धा ४.२, नागपूर १.४, भंडारा ३.८, गोंदिया २.२, चंद्रपूर १२.३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.