Monday, December 22 2025 10:57 am
latest

राज्य सेवा मुख्य २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, 19 : राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर ३० नोव्हेंबर,२०२३ ते १८ जानेवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा हा कार्यक्रम संपल्यानंतर एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदांकरीता ६२३ उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील.