Tuesday, March 24 2026 5:46 pm

राज्यसभेचे उपसभापती हरीवंश सिंह यांचे मुंबईत आगमन

मुंबई, 23 : राज्यसभेचे उपसभापती हरीवंश सिंह यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानाने संध्याकाळी 7.00 वाजता आगमन झाले.

यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिव (२) श्रीमती मेघना तळेकर यांनी श्री सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानभवन येथे २३ व २४ जून, २०२५ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय परिषदेस उपसभापती श्री.सिंह उपस्थित राहणार आहेत.