Monday, December 22 2025 11:24 pm
latest

मैंदर्गीतील शासकीय जमिनीवरील अनधिकृत गाळ्यांबाबत बैठक घेणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, 16 : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगर परिषदेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवर अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांच्या प्रकरणी लवकरच बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सचिन कल्याण शेट्टी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती.

नगरपरिषदेकडून अतिक्रमण केलेल्या २५ अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन अतिक्रमण आणि अनधिकृत धार्मिक बॅनर, पोस्टर्स इत्यादी नगरपरिषदेकडून हटविण्यात आले आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने बैठक घेऊन कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.