Thursday, February 5 2026 6:10 pm

मुलानं कारनं पाठलाग करत वडिलाच्या गाडीला मारली धडक

ठाणे,21 – घरगुती वादातून 38 वर्षीय मुलानं फिल्मी स्टाईलनं कार चालवत वडिलाच्या कारचा पाठलाग करत जोरदार धडक दिल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात मधात आलेले 5 जण गंभीर जखमी झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बदलापूर – अंबरनाथ मार्गावरील चिखलोली गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल समोर घडली आहे. यप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात वडील बिंदेश्वर शर्मा (वय 62, रा. कुलाबा मुंबई ) यांच्या तक्रारीवरुन मुलगा सतीश शर्मा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता बिंदेश्वर शर्मा आणि त्यांचा मुलगा सतीश हे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरुन वेगवेगळ्या कारनं जात होते. बिंदेश्वर आणि कुटुंब एका पांढऱ्या फॉर्च्युनरमध्ये होता, तर काळ्या टाटा सफारीत आरोपी मुलगा सतीश त्यांच्या मागं जात होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून येते की, अंबरनाथच्या दिशेनं टाटा सफारी कार चालली होती. त्यावेळी घटनास्थळी काही करणावरुन वाद होऊन दोन्ही कार थांबल्या. यावेळी त्या ठिकाणी थांबलेल्या नागरिकांनी धाव घेतली. मात्र आरोपी सतीशनं आधी त्याच्या वडिलांच्या कारला मागून धडक दिली.

सतीश त्यानंतर पुढं वळवला आणि हॉटेलच्या समोर थांबलेल्या कार पुढं येण्याआधी तो परत आला. वडिलाच्या कारला जोरदार धडक दिल्यानंतर, जेव्हा कार चालकानं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं दार उघडलं. यावेळी त्यानं त्याच्याजवळ बसलेल्या एका अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत केली. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या नागरिकांना त्याच्या कारची धडक झाली. यूटर्न मारताना एक व्यक्ती सतीशच्या कारच्या बोनेटवर खाली पडून रस्त्यावर कोसळला. एवढ्यावर आरोपी सतीश थांबला नाही, तर त्यानं त्याच्या वडिलांच्या कारला धडक देण्यासाठी यू-टर्न घेतला तेव्हा, त्याला 50 फूट कारनं ढकलत गेला. या अपघातात दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले.