Monday, December 22 2025 6:29 pm
latest

मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबई,16 : कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एम.सी.एम.सी.) प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

राज्यात लोकसभा निवडणूक 2024 पाच टप्प्यात होणार आहे. त्यानुषंगाने मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदान दिनी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी त्या 48 तास आधी एम.सी.एम.सी. कडून पूर्व-प्रमाणित करून घ्यावी, असे निर्देश आयोगाने दिले आहे.