Thursday, February 5 2026 9:29 pm

मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर अज्ञात इसमाकडून दगडफेक

मुंबई, 30 ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारावेळी आज्ञात इसमाने त्यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात घडली. याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांचा प्रचार गोवंडी परिसरात सुरू असताना अचानक एक दगड प्रचारातील रथावर येऊन पडला. हा दगड एका महिला कार्यकर्त्याला लागल्याचा आरोप यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. घटनेनंतर कार्यकर्त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून याबाबत तपास करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिली आहे.