Monday, December 22 2025 10:33 am
latest

‘माविम’कडून नवं तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

मुंबई, 9 : महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे ‘नवं तेजस्विनी‘ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव ११ ऑक्टोबर २०२४ पयत दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत वनिता समाज सभागृह, वीर सावरकर मार्ग, दादर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात बचत गट उत्पादीत वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे.