Monday, December 22 2025 10:36 am
latest

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर, 19 : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवास येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला.

शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख तथा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी मंत्री श्री. लोढा यांचे स्वागत केले.

राज्यातील रोजगार निर्मिती क्षेत्र, पायाभूत सुविधा, केंद्र व राज्य शासनाकडून विकासासाठी होत असलेले प्रयत्न आदी विविध बाबींची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी दिली. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शासनाकडून कौशल्य विकास कार्यक्रमावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी सुयोग येथे पत्रकारांसाठी उपलब्ध व्यवस्थेची पाहणी केली. श्री. डोईफोडे यांनी आभार मानले.