Thursday, February 5 2026 9:05 pm

भाजप उमेदवार संजय केळकर यांनी केला हिरानंदानी इस्टेट परिसरात माॅर्निंग वाॅक

– केळकर यांना पुन्हा निवडुन आणण्याचा नागरिकांचा निर्धार केला.

ठाणे, 10 – ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ब्रह्माळा तलाव परिसरापाठोपाठ घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटमधील टेनिस कोर्ट गार्डन येथे माॅर्निंग वाॅक करत नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी तुम्ही केलेल्या कामांमुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा भावना नागरिकांनी व्यक्त करत जनसेवक केळकर यांना पुन्हा निवडुन आणण्याचा निर्धार केला.

ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने करीत आहेत. केळकर हे सुद्धा शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर संजय केळकर हे सकाळच्या वेळेत माॅर्निंग वाॅकची ठिकाणे असलेल्या भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात माॅर्निंग वाॅक करत नागरिकांच्या भेटी घेतल्या. या भेटीत नागरिकांनी ‘आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच संजय केळकर’ अशा भावना व्यक्त करत ‘जय श्री राम’ च्या घोषणा दिल्या होत्या. त्यापाठोपाठ त्यांनी रविवारी सकाळी ७ वाजता घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटमधील टेनिस कोर्ट गार्डन येथे माॅर्निंग वाॅक करत नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी यावेळी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, निवडणुक उमेदवार प्रतिनिधी सुभाष काळे, भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, भाजप आणि शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हिरानंदानी इस्टेटमधील टेनिस कोर्ट गार्डन परिसरात नागरिक सकाळी माॅर्निंग वाॅक करण्यासाठी येतात. या नागरिकांसोबत माॅर्निंग वाॅक करत केळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तुम्ही केलेल्या कामांमुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. तसेच जनसेवक संजय केळकर यांना पुन्हा निवडुण आणण्याचा निर्धार केला.