Monday, December 22 2025 7:01 pm
latest

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानसभेत ठराव

नागपूर, 20 : पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला.

महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.