Monday, December 22 2025 10:39 am
latest

परभणी जिल्ह्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांची पाहणी करावी : विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचे निर्देश

मुंबई, 13 : महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत महाराष्ट्र जलसंधारण प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू जिंतूर तालुक्यातील कामांची पाहणी करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी दिले.

विधानभवन येथे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत महाराष्ट्र जलसंधारण प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू जिंतूर येथील योजनेच्या कामासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे संचालक सु.पा.कुशिरे, छत्रपती संभाजीनगरचे अ.हा.परांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे क्षेत्र अधिकारी किरण मळभागे, अक्षय काकडे उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे म्हणाले की, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत देण्यात आलेल्या कामाची निविदा ही सर्व अटी व शर्तींचे पालन करून केली आहे. या निविदेतील सर्व कामे पूर्ण केली आहेत. मात्र शासनाने दिलेल्या निकषांची पूर्तता करून केलेल्या कामांचीच बीले काढली जावीत. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास विभागाने योग्य ती कारवाई करावी तसेच निविदेतील कामांची पाहणी संयुक्तरित्या करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.