Monday, December 22 2025 7:04 am
latest

न्या. एस.पी. तावडे यांचे कायदेशीर उपायांवर भाष्य कायदा आणि वैद्यकशास्त्र – संबंध आणि परस्परसंवाद” या विषयावर राष्ट्रीय परिसवांद

ठाणे, 24 : वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये ग्राहक हक्क आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही ऐतिहासिक निकालांचा उल्लेख करून उपलब्ध कायदेशीर उपायांवर भाष्य करताना न्यायमूर्ती एस.पी. तावडे यांनी अपघाताच्या वेळी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकडून प्रामाणिक आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करताना डॉक्टरांची चूक नसल्यास कायदेशीर कारवाईची भीती बाळगू नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विद्या प्रसारक मंडळाच्या टी. एम.सी. विधी महाविद्यालयात एक दिवसीय“ कायदा आणि वैद्यकशास्त्र – संबंध आणि परस्परसंवाद” या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसवांदात एकूण सहा सत्र झाले. उद्घाटन सत्रामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण आयोगाचे अध्यक्ष एस. पी तावडे व डॉ शिवकुमार उत्तुरे, डॉ. माधुरी पेजावर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. डॉ. श्रीविद्या जयकुमार, यांनी परिसंवादाचे महत्त्व विषद केले. डॉ. पेजावर यांनी वैद्यकीय-कायदेशीर पैलूंचा इतिहास आणि पार्श्वभूमी आणि त्यासंबंधी कायदा याविषयी सांगितले. औषधांच्या चाचण्यांदरम्यान जे प्रश्न येतात त्याप्रमाणे प्राणी कल्याणाशी संबंधित कायद्यांचाही समावेश करण्याची सूचना त्यांनी केली. डॉ. उत्तुरे यांनी वैद्यकीय आणि नर्सिंग व्यवसायाचे नियमन आणि नियमन करणारे कायदे आणि त्यांच्या कायदेशीर तरतुदींचे तपशीलवार वर्णन केले, विशेषत: डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी काय करावे आणि करू नये यावर प्रकाश टाकला आहे.
दुसऱ्या सत्रामध्ये अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वकील डॉ. गोपीनाथ शेणॉय आणि ॲड. अमित कारखानीस यांनी मार्गदर्शन केले. डॉ. शेणॉय यांनी भारतातील प्रसिद्ध अशा तीन न्याय निर्णयाची चर्चा केली ज्यामुळे वैद्यकिय निष्काळजीपणाशी संबधित कायदे समोर आले. कारखानीस यांनी सरोगसीमधील वैद्यकीय-कायदेशीर समस्या आणि पुनरुत्पादक तंत्रज्ञान याविषयावर भाष्य केले. या आधुनिक कार्यपद्धती आणि त्यांच्या अनुषंगिक कायदेशीर पैलूंवर चर्चा करताना त्यांनी विशेषत: त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारासह मूलभूत अधिकारांचे तपशीलवार वर्णन केले. परिसवांदच्या तिसरे सत्र वैद्यकीय निष्काळजीपणाच्या वास्तविक घटनेवर आधारित कला आणि नाट्यमय सादरीकरणाने सुरू झाले . ‘डॉक्टर हाजीर हो’ असे या नाटकाचे नाव होते. नाटकाची पटकथा डॉ. शैलेंद्र जाधव आणि डॉ. स्वरूपा अय्यर आणि त्यांच्या ठाणे आणि मुंबईतील प्रॅक्टिस करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या टीम सदस्यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली. डॉक्टरांविरुद्ध खोट्या तक्रारी करू नका, असा संदेश त्यांनी या नाटकाद्वारे समाजाला दिला.