Thursday, February 5 2026 10:29 am

नौपाड्यातील ताराबाग सोसायटीमध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा

ताराबागमध्ये पहिला वहिला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा संपन्न ; भाविकांची पादुका दर्शनासाठी मोठी गर्दी

ठाणे, 31: ठाण्यातील नौपाडा ताराबाग सोसायटीत स्वामी समर्थ भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मंदिरात पहिला वहिला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात पार पडला. प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिन्मय पादूकांचे पुजन व दर्शन सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सकाळपासूनच स्वामी भक्तांनी हजेरी लावून पादुकांचे दर्शन घेतले. या सोहळ्यात स्वामी समर्थ महाराज स्वतःहून आशीर्वाद देण्यासाठी आले असल्याचा भास होत असल्याची प्रतिक्रिया समस्त भाविकांनी बोलताना व्यक्त केली.
श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ठाणे आणि आर्शा विद्याविलास फाउन्डेशन, ठाणे. या मठाचे मठाधीश पुज्य श्री. गुहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिन्मय पादुकांचे पुजन व दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती निमंत्रक विद्याधर वैशंपायन यांनी दिली. नौपाडयातील ताराबाग सोसायटी मंदिरच उभारण्यात आले नाही तर तेथे भक्त मंडळाचीही स्थापना करण्यात आलेली आहे. त्या मंडळाच्या माध्यमातून पुढे या मंदिराचे काम केले जाणार आहे. असे बाळा खोपकर यांनी बोलताना सांगितले. तर , पहिल्या वहिल्या सोहळ्याच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका पूजन आणि दर्शनाने त्या मंदिरात स्वामींचा वास प्रत्यक्षात भासत होता असेही भाविकांनी बोलताना सांगितले.
……………