Monday, December 22 2025 1:31 pm
latest

नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी रणनीती तयार – लोकनेते आमदार गणेश नाईक

नवी मुंबई, ११ – गेले दोन दिवस नवी मुंबईमध्ये ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी प्रचार दौरे सुरु असून सर्व माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण आहे. नरेश म्हस्के यांना विजयी करायचे, हेच टार्गेट आणि स्टॅटेजी असल्याची माहिती लोकनेते आमदार गणेश नाईक दिली.
नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज नवी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना गणेश नाईक यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
बैठकीला माजी खासदार डॉ. संजिव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर सागर नाईक, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवा नेते वैभव नाईक, गणेश म्हात्रे, रामचंद्र घरत, महिला उपाध्यक्ष वर्षा भोसले, बेलापूर निवडणूक प्रमुख निलेश म्हात्रे, भाजपाचे सर्व उपाध्यक्ष, सचिव, सहचिटणीस, शक्ती केंद्र, प्रकोष्ठ, वॉरियर्स, सुपरवॉरियर्स, प्रभाग, वॉर्ड, बुथ प्रमुख, माजी नगरसेवक उपस्थित होते. भारत माता की जय, फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार च्या घोषणा सभागृहात देण्यात आल्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता `अबकी बार, 400 पार’, `बार बार, मोदी सरकार’ हा निर्धार महायुतीच्या सर्व पक्षांनी केला आहे. त्या अनुषंगाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. आज नवी मुंबईतील भाजपाचा कार्यकर्ता सर्वार्थाने कामाला लागल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी घडण्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे. म्हणून नरेश म्हस्के यांचे निवडून जाणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने कामाला लागावे, असे आवाहन गणेश नाईक यांनी केले.
नाईक कुटुंबिय गेले दोन दिवस प्रचारात पूर्ण ताकदीने उतरले आहे. नगरसेवक, पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. अबकी बार ४०० पार करण्याकरता सगळे काम करत आहेत. १४० करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी. या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.