Monday, December 22 2025 3:10 pm
latest

नदी, नाले, ओढे. धरण, धबधब्यांसारख्या पूरस्थिती असलेल्या भागात जाणे टाळण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई, 26 :- राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरंच घराबाहेर पडावे. नदी, नाले, ओढे. धरण, पूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगर, टेकड्या, दऱ्या, धबधब्यांसारख्या ठिकाणी पुराचे पाणी अचानक वाढणे, निसरड्या वाटेवर पाय घसरुन अपघात होण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सद्यस्थितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये. दरडप्रवण, पूरग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, आवाहनांचे पालन करावे. स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.