Monday, December 22 2025 7:29 am
latest

दिव्यांग अधिकारी-कर्मचारी सक्षमपणे चालविणार मतदान केंद्रे

ठाणे, 18 – दिव्यांग बांधव हा आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला सोपविलेले काम सक्षमपणे करण्यास समर्थ असतो. जिल्ह्यातील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतही हे सक्रियपणे कार्यरत असून जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक मतदान केंद्रांचे संपूर्ण संचालन हे दिव्यांग अधिकारी, कर्मचारी सक्षमपणे करण्यास सज्ज झाले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायं. 6.00 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रे सज्ज होत आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात आपले योगदान देण्यासाठी जिल्ह्यातील दिव्यांग अधिकारी, कर्मचारी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील 18 मतदान केंद्रांचे संचालन हे संपूर्णपणे फक्त दिव्यांग कर्मचारीच करणार आहेत. दिव्यांग बांधव आपले हे अमूल्य योगदान देत असताना नागरिकांनीही मोठ्या संख्येने मतदान करून त्यांचा उत्साह वाढवावा व लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील दिव्यांग मतदान केंद्रे :
134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 209 (खोली क्र. 1 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कांबे, ता. भिवंडी, जि. ठाणे)
135 शहापूर अ.ज. मतदान केंद्र क्र. – 154 (ग. वि. खाडे विद्यालय, शहापूर),
136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 67 (प.रा. प्राथमिक विद्यालय, तळमजला खोली क्र. 4 भिवंडी),
137 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 103 (दादासाहेब दांडेकर हायस्कूल, तळमजला, भिवंडी ),
138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. –182 (हरिलाल मिठाबाई प्रा. शाळा, गुजराथी माध्यम, तळमजला, तपसी पांडे कम्पाऊंड, ओक बाग, कल्याण),
139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 319 (न्यू इंग्लिश स्कूल, मुरबाड, उत्तरेकडून खोली क्र. 1),
140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 20 (महात्मा गांधी विद्यालय, खोली क्र. 2 तळमजला, अंबरनाथ पश्चिम),
141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 220 (जुनी प्रशासकीय इमारत, उपविभागीय अधिकारी कार्यालय, संजय गांधी शाखा, पवई चौक, हिराघाट उल्हासनगर नं. 3),
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र – 168 (आरकेटी हिंदी हायस्कूल, खोली क्र. 2 सह्याद्री पार्क, कैलासनगर, काटेमानिवली ),
143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 184 (आय.ई. एस, चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली पूर्व)
144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. –235 ‍( न्यू लॉर्ड इंग्लिश हायस्कूल, गोळवली)
145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र क्र. 64 (रुम नं. 1 अवर लेडी ऑफ वेलकंनी स्कूल)
146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 347 ( टीएमसी जिद्द शाळा, तळमजला, रुम नं. 1 ठाणे),
147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 306 (विठ्ठल रखुमाई सेवा संघ, फ्रंट कमाल तलाव शेड, पार्टीशन नं. 2 गांधीनगर रोड, गांधीनगर),
148 ठाणे विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 333 (सरस्वती एज्युकेशन सोसायटी, के.जी. क्लासरुम, तळमजला, रुम नं. 3 ए, पाचपाखाडी)
149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 120 (न्यू कळवा हायस्कूल, कळवा )
150 ऐरोली विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 145 ( दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी, रुम नं. 1 सेक्टर 16, ता.जि. ठाणे ),
151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 234 (यस टी. झेव्हियर हायस्कूल इंग्रजी आणि मराठी माध्यम, तळमजला रुम नं. 01 नेरुळ, नवीमुंबई)