Friday, March 6 2026 8:53 am

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिदू मुस्लिम एकता इफ्तारी-२०२४ चे आयोजन

ठाणे, 08 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रमजान सणानिमित्त रविवारी, ‘हिंदू मुस्लिम एकता इफ्तारी-२०२४’ चे आयोजन करण्यात आले.

सामाजिक सलोखा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हिंदू मुस्लीम सर्व समाज एकत्र येऊन सण साजरे करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपेसाहेब व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्लासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी व माझे सहकारी उमेर फारुकी यांच्यातर्फे इफ्तारी पार्टीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने एकच संदेश आहे, या देशात, या राज्यात सर्व हिंदू मुस्लीम एकत्र आहेत, अशी प्रतिक्रिया ठाणे परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख यांनी व्यक्त केली.

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, मध्यवर्ती कार्यालयासमोर रविवारी, परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) सेक्रेटरी उमेर फारुकी यांच्या आयोजनाखाली, रमजान सणानिमित्त ‘हिंदू मुस्लीम एकता नजीब मुल्ला इफ्तारी २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. वनिताताई गोतपागर, महिला अध्यक्षा, ठाणे शहर (जि.), संदेश पाटील युवक कार्याध्यक्ष, ठाणे शहर (जि.),अल्पसंख्यांक विभागाचे ठाणे शहर (जि.) अध्यक्ष श्री. हुसेन मणियार, ठाणे शहर (जि.) सरचिटणीस श्री. रविंद्र पालव, विधानसभा अध्यक्ष श्री. विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष श्री. समीर पेंढारे, श्री. अजित सावंत महिला विधानसभा अध्यक्षा सौ. वंदना खानोलकर, सौ. अरुणा पेंढारे, सौ. सुवर्णा खिल्लारी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हिंदू व मुस्लिम बांधव तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या.